spot_img
spot_img
20.1 C
New York
Tuesday, June 9, 2026

शिक्षण साहित्य स्पर्धेत कु. मुसरतजहाॅं खान जिल्ह्यातून प्रथम

प्रतिनिधी भिसी:-

भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन २०२४-२०२५ चे आयोजन करण्यात आले. हे विज्ञान प्रदर्शन राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर तसेच जिल्हा परिषद, चंद्रपूर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यात शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य गटातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कपर्ला ता. चिमूर येथील विज्ञान विषय शिक्षिका कु. मुसरतजहाॅं अलीमोहम्मद खान (सौ. मुसरतजहाॅं परवेज शेख) यांचा प्रथम क्रमांक आला.

त्यांनी गणितीय मॉडेलिंग व संगणकीय विचार या विषयांतर्गत शैक्षणिक साहित्य निर्माण करून सादरीकरण केले. त्यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री राजेश पातळे, उपशिक्षणाधिकारी श्री निवास कांबळे, प्राचार्य श्री जयवंत टोंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले व राज्यस्तरासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!