हजारोच्या संख्येत काळ्या फिती बांधून मूकमोर्चा धडकला पोलीस स्टेशनवर
भिसी पो. स्टे. येथे पाक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
आरोपी ला कठोर शिक्षा (मृत्युदंड) देण्यासाठी पोलिस प्रशासनाला दिले निवेदन
चिमूर तालुका प्रतिनिधी- किशोर आष्टनकर
तालुक्यातील गजबजलेल्या भिसी येथे ४० वर्षे वयाच्या युवकाने एका अल्पवयीन बालीकेला चाकलेट चे आमीष दाखवून अत्याचार केल्याची घटना रविवार ला अंदाजे तीन वाजताचे सुमारास उघडकीस आली. पिडीत बालीकेच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन भिसी येथे पाक्सो कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
प्राप्त माहीती नुसार रविवार ला दुपारी तीन वाजताचे सुमारास आरोपी अरविंद हरिदास नगराळे वय अंदाजे ४० वर्षे राहणार भिसी या युवकाने एका अल्पवयीन बालीका आपल्या समवयस्क मित्रमैत्रिणीसोबत घराजवळ खेळत असतांना आरोपी ने बालीकेसोबत खेळत असलेल्या बालकांना खाऊसाठी पैसे दिले व त्यांना दुकानात पाठवून दिले त्यानंतर आरोपी ने पिडीत बालीकेला चाकलेट चे आमीष दाखवून एका पडक्या घराच्या आत मध्ये नेऊन अत्याचार केल्याची घटना अंदाजे तीन वाजताचे सुमारास उघडकीस आली. पिडीत बालीकेच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन भिसी येथे आरोपी अरविंद हरिदास नगराळे वय ४० वर्षे यांचे विरूद्ध कलम ६४,६४ (२) (आय), ६४(२), (जे) बाल अत्याचार प्रतिबंधक अधिनियम- सहकलम ४,८ पाक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपी ला अटक करण्यात आलेली आहे.
परंतू अशा असामाजिक घटना घडू नये व आरोपीस कठोर शिक्षा देऊन फाशी झालीच पाहिजे या मागणी साठी आज सर्व भिसी वासीय जनतेच्या वतीने काळ्या फिती बांधून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते हा मूक मोर्चा श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसी येथून निघत पोलीस स्टेशन भिसी येथे येऊन धडकला या मोर्चामध्ये भिसी येथील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पोलीस स्टेशनवर धडकलेल्या नागरिकांना भीसी पोलिस ठाणेदार श्री चांदे साहेब यांनी आम्ही सुद्धा चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर शिक्षेची मागणी करून आपले निवेदन वरिष्ठ स्तरावर तात्काळ पाठवतो असे आश्वस्त केल्यानंतर मोर्चा शांत झाला.






