भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे आयोजन…..
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा भद्रावती शहरात दिनांक १२ जानेवारी २०२५ ला व वाॅक्याथान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सर्व आबालवृद्ध, भद्रावतीतील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मागील पाच वर्षात सातत्याने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून भद्रावती शहराला एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे कार्य भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीने केली आहे. यावर्षी बालपण या थीमवर आधारित वाॅक्याथान स्पर्धा दिनांक १२ जानेवारी २०२५ ला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवक दिन व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती चे औचित्य साधून भद्रावती शहरात आयोजित करण्यात आली. या वाॅक्याथान स्पर्धसाठी यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात सकाळी सात वाजता सर्वांनी एकत्रित व्हायचे आहे. बालगोपाल व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते या वाॅक्याथान स्पर्धेचे उद्घाटन होऊन ही स्पर्धा सुरू होणार आहे. यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणातून ही स्पर्धा सुरू होऊन गणेश मंदिर द्वार ते पुन्हा यशवंत शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे पटांगण असे अंतर राहणार आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी शिंदे कॉलेज ते आंबेडकर चौक व आंबेडकर चौक पासून परत शिंदे कॉलेज अशी स्पर्धा ठेवली जाणार आहे. निरोगी दीर्घायुष्यासाठी आयोजित या सामाजिक उपक्रमात विविध सामाजिक संघटनेतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तेव्हा भद्रावतीकरांनी मोठ्या संख्येत विविध वेशभूषा परिधान करून या वाॅक्याथान स्पर्धेत सहभागी व्हावे व आपले पारितोषिक प्राप्त करावे, असे आवाहन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांनी केले आहे .
या पत्रकार परिषदेला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे, सदस्य डॉ जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ एल.एस.लडके व प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.






