spot_img
spot_img
20.1 C
New York
Tuesday, June 9, 2026

‌राज्यस्तरीय पहिले मराठी भाषाप्रेमीशैक्षणिक साहित्य सम्मेलन नागपूरात १२ जानेवारीपासून

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व अभिनेते अंकुश चौधरी यांची असणार विशेष उपस्थिति

नागपुर
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ‘मराठी ज्ञानभाषा व्हावी’ ही जिद्द मनाशी बाळगून ‘ आम्ही मराठी’ ही चळवळ सुरु करण्यात अली आहे. त्या अनुषंगाने, नूतन भारत विद्यालय व
कनिष्ठा महाविद्यालय नागपूर, विदर्भ साहित्य संघ, नागपुर महानगरपालिका शिक्षण विभाग नागपुर, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ नागपूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १४ जनवरी २०२५ या कलावधीत मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कविवर्य सुरेश भट्ट सभागृह, रेशमबाग नागपूर येथे रविवार, १२ जानेवारी रोजी सायं. ६ वाजता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते होणार असुन मराठी सिने कलावंत अंकुश चौधरी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सम्मेलनाचे अध्यपद अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभने भूषविणार असुन स्वागताध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते हे राहणार आहेत. याप्रसंगी सर्व आमदार
अभिजीत वंजारी, मोहन मते, प्रवीन दटके, विभागीय उपसंचालक उल्हास नरड , शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिद्धेश्वर कालुसे, डस्कलीन इंफ्रा ली. चे निर्माता समीर महाजन, विदर्भ साहित्य संघाचे सचिव विलास मानेकर आणि मनपाच्या क्रीड़ा आणि सांस्कृतिक विभागाचे पीयूष अंबुलकर यांची विशेष उपस्थिती राहिल. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडी व पूजन झाल्यानंतर सायं ५.३० वाज़ता मराठी बँड पथकाचे विशेष सादरीकरण होणार आहे.

परिसंवाद, चर्चाशास्त्र कविसंमेलन

सोमवार, १३ जानेवारी रोजी सकाली १० वाजता ‘बालभारती आणि मराठी मनाचे बंध’ या विषयावर साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड, मोहन शिरासाट, डॉ प्रतिभा इंगोले, प्रकाश एडलाबादकर, मधुकर धर्मपुरीकर या लेखकांचा यात सहभागा राहिल. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ ज्ञानेश हटवार उपाध्यक्ष आणि प्रतिभा लोखंडे हे करतील. त्यानंतर ११.४५ वाजता ‘मराठीची सद्यस्थिती व ज्ञानभाषा दिशा’ या विषयावर चर्चासत्रात आ. अभिजीत वंजारी, माजी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेश लेंडे, संशोधन मंडळाचे सचिव डॉ. राजेंद्र वाटाणे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले आणि मराठी अभ्यासक्रम मंडळ, पुणे चे सदस्य प्रा. डॉ. पांडुरंग कंद यांचा सहभाग राहिल. सूत्रसंचालन प्रा. सुरेश नखाते जिल्हा प्रतिनिधी तर मुलखत वृषाली देशपांडे घेतिल.

दूपारी २ वाजता माजी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांचे नवोपक्रम सादरीकरणाला सुरूवात होईल. सूत्रसंचालन आर. जे. करणार आहेत . ३.४५ वाजता ‘ज्ञानभाषा प्रवासात प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्रात संपादक मंडळी सहभागी राहतील. तरूण भारतचे संपादक गजानन निमदेव, महाराष्ट्र टाईम्स चे संपादक श्रीपाद अपराजित, एबीपी माझा चे प्रतिनिधी आणि दैनिक साकाळचे संपादक आमिर काळबांडे आदी सहभागी होतील. सायं.५.३० वाजता कवि बबन सराटकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होइल. यात मनीषा रिठे, प्रसन्नजित गायकवाड, मीनल येवले, प्रकाश कांबळे, डॉ. मनोहर नारान्जे, गोमासे, गणेश भाकरे, सुनील वाडे, उज्वला आखरे, प्रा. भगवंत शोभने, विशाल देवतळे तसेच, बालकवी वल्लभ गावंडे, युक्ता गोमासे आणि स्वरश्री तंदुळकर यांचा सहभाग राहिल. सूत्रसंचालन प्रा. संजय तिज़ारे करतील. सायं. ६.४५ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

समारोपीय कार्यक्रम

मंगलवार, १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता डॉ. रविंद्र शोभने यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्मेलनाचा समारोप होणार असून याप्रसंगी प्रमुख वक्ते शिक्षक अमदार सुधाकर अडबाले, ए. विकास ठाकुर, माजी महापौर संदीप जोशी, नागपूर शिक्षण मंडळ अध्यक्ष राधा सावरकर, सचिव चिंतामन वंजारी यांच्यासह मनिवरांची उपस्थिती राहिल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मानसी कोलते करणार आहेत. बक्षीस वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता होइल. मराठी भाषाप्रेमी पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी सम्मेलनाचा मोठ्या सांख्येन लाभ घ्यावा, ऐसे आवाहन भारतीय विद्या प्रसारक संस्था सचिव रमेश बक्षी, संस्था समिति अध्यक्ष रविंद्र कटोलकर, संघ सचिव डॉ. वंदना बडवाईक, सहसंयोजक समिर महाजन यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला यांच्या सह अनिल गोतमारे, सपन नेहरोत्रा, सुरेश नखाते, संजय तिजारे आदी उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!