मुख्य बस स्थानक परिसरात खुलेआम चालणाऱ्या सट्टापट्टीला आशीर्वाद कोणाचा?
तालुक्यातील शेगाव बु मध्ये सध्या अवैध धंद्याना उत आला आहे. अवैध धंद्याना लगाम लावणे जणू इथे मुश्किलच झाले आहे. राजरोजपणे चालणाऱ्या या अवैध धंद्यावर वचक कुणाचीस नाही का? असा प्रश्न मात्र सर्व सामान्यांना पडलेला आहे. यातच ऐन बस स्थानक चौकात खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय राजरोसपने सुरु आहे. ऐन वरदळीच्या ठिकाणी पानटपरीवर सुरु असलेल्या सट्टा पट्टी व्यवसायावर पोलीस प्रशासनाची कमालीची डोळेझाक बगायला मिळत आहे.
खुलेआम चालणाऱ्या या सट्टा पट्टी व्यवसायिकावर वर पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही? या अवैध व्यवसायिकावर वरदहस्त तरी कुणाचा? या राजरोसपणे चालणाऱ्या व्यवसायिका सोबत पोलीस प्रशासनाचे काही हितसंबंध तर जोपासले तर जात नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न नागरिक दबक्या आवाजात बोलले जात आहे.






