भद्रावती
स्थानिक यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक सहल शिवतीर्थ ऍग्रो पार्क नागपूर येथे आयोजित करण्यात आली. सदर सहलीमध्ये महाविद्यालयातील एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच प्रा संगीता जक्कुलवार, प्रवीण मत्ते, वर्षा दोडके, प्रेमा पोटदुखे , रवींद्र देऊरकर हे सुद्धा सहलीमध्ये विद्यार्थ्यांसोबत सहभागी होते. सदर सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी वॉटर पार्क , अडवेंचर गेम तसेच निसर्गरम्य स्थळाचा मनमुराद आनंद लुटला.
सदर सहल प्रा. डॉक्टर कार्तिक शिंदे सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, संस्थेचे सदस्य डॉक्टर जयंत वानखेडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर मोते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. सदर सहल यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अतुल गुंडावार, उज्वला वानखेडे , हरिअर मोहरकर, शेखर जुमडे , डॉ. ज्ञानेश हटवार यांचे सहकार्य लाभले.






