spot_img
spot_img
20.3 C
New York
Friday, July 31, 2026

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

चंद्रपूर, दि. 16 : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 12 वीच्या नंतर मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रकियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते.

लाभार्थी निवडीचे निकष : विद्यार्थी हा धनगर समाजातील असावा. इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांने इयत्ता 12 वी नंतर मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी हा चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा असावा. एका विद्यार्थ्यांस 5 वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 पेक्षा जास्त नसावे. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी प्रवेश घेतलेला विद्यार्थी योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी लाभास पात्र असेल तथापि, सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उर्त्तीर्ण होणे अनिवार्य राहील. धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्याना सदर योजनेचा लाभ प्राथम्याने देय राहील.

असा करा अर्ज : या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यास ऑफलाईन पध्दतीने संबंधित सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, चंद्रपूर यांचेकडे अर्ज करणे अनिवार्य राहील. तरी सदर योजनेकरीता तात्काळ अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!