नागपूर : भाजपच्या 16 कॅबिनेट मंत्री आणि 3 राज्यमंत्री अशा 19 मंत्र्यांना तर शिवसेनेच्या 9 कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्री अशा एकूण 11 मंत्र्यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्र्यांना आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पी.राधाकृष्णन यांनी मंत्रीपद तथा गोपनीयतेची शपथ दिली.

या मंत्रिमंडळात भाजपच्या पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे अशा 4 महिला मंत्र्यांचा देखील समावेश आहे.






