spot_img
spot_img
20.3 C
New York
Friday, July 31, 2026

भद्रावतीच्या लक्ष्मीनगरमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था

नागरिकांनी केली त्वरित उपाययोजनेची नगर पालिकेला मागणी

भद्रावती, दि.१५ : येथील विंजासन रोडवरील लक्ष्मीनगर वसाहत, पांडव वार्डमध्ये २०१३-२०१४ पासून नागरी वसाहत अस्तित्वात आली आहे. मात्र, येथील रस्त्यांचे अद्याप खडीकरण किंवा डांबरीकरण झालेले नाही, त्यामुळे येथील १७ कुटुंबांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनते. चिखल आणि पाण्याने रस्ते जलमय होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

नागरिकांनी वारंवार नगरपरिषद भद्रावतीकडे डांबरीकरण आणि ओपन स्पेस विकसित करण्याची मागणी येथील रहीवाशी नागरिक सुनील पोटदुखे, प्रवीण गिरोले, कृष्णमुरारी तिवारी, नितीन चेंदे, रवींद्र राम, अनिल घडले, संजय मासळकर, केशव बोंडे, वैभव सोनुकले, कु. चेतना भगत यांनी नगर परिषदे भद्रावतीला २४ मे २०२३ रोजी निवेदन सादर केले व समस्या मांडल्या गेले होते. मात्र, १ वर्ष होऊनही या समस्यांवर अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. लक्ष्मीनगरमधील नागरिकांनी नगरपरिषदेकडून त्वरित रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली असून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!