भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची चिचोर्डी, भद्रावती येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती साजरी करण्यात आली.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रमुख अतिथी प्रा शेखर जुमडे , डॉ ज्ञानेश हटवार
व्यासपीठावर उपस्थित होते. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना “संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्यामुळेच तुकाराम महाराजांची गाथा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचली” असे वक्तव्य प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले. प्राध्यापक शेखर जुमडे यांनी संताजीच्या जीवन कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हरीहर मोहरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राकेश आवारी यांनी केले. कार्यक्रमाला समस्त शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रमेश चव्हाण, रवी देऊरकर, अशोक पिदुरकर, आदींनी परिश्रम घेतले.






