भिसी:-
भिसी येथील महिला श्रीमती अनुसया शंकर बानकर वय अंदाजे
६५ वर्ष ही महिला भिसी येथील शेतकरी नाना शिवरकर यांच्या शेतात शेतमजुरी करण्याकरिता गेली असता, शेतात काम करताना दुपारी १ वाजताच्या सुमारास विषारी सापाने चावा घेतल्याने महिलेचा मृत्यू झाला.
सर्प दंशाने मयत झालेल्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. श्रीमती अनुसया शंकर बानकर यांच्या मृत्यूपश्चात रविंद्र व राजू असी दोन मुलं व नातवंडं, बराच मोठा आप्तपरिवार आहे. दिवाळी घ्या पूर्वीच सदर महिलेचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






