spot_img
spot_img
22.6 C
New York
Tuesday, August 4, 2026

भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचा उमेदवारी अर्ज चिमूर येथे दाखल..

भिसी

आज दि. २४ ऑक्टोबर रोज गुरुवारला चिमूर- ७४ विधानसभा निवडणूक २०२४ भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किर्तीकुमार ( बंटीभाऊ) भांगडिया यांचा नामांकन अर्ज दाखल केला.

हा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी नेहरू विद्यालय चिमूर ते प्रशासकीय भवन (तहसील कार्यालय चिमूर) पर्यंत आयोजित भव्य नामांकन महारॅली काढण्यात आली. या रॅलीत माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती महाराष्ट्र राज्य अशोकजी नेते यांनी प्रचंड हजारोच्या संख्येत काढलेल्या महारॅली च्या जनसमुदायात सहभागी होऊन आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे नामांकन दाखल केले.

नामांकन दाखल करायला जाण्यापूर्वी चिमूर शहराचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेत बैलबंडी वरून हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने आमदार बंटीभाऊ भांगडिया यांची भव्य नामांकन महारॅली नेहरू विद्यालय चिमूर च्या प्रांगणातून सुरू होत मुख्य मार्गाने वाजत – गाजत व नृत्य सादर करत तहसील कार्यालय चिमूर इथे येऊन पोहोचली.


यावेळी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया, माजी विधान परिषद सदस्य मितेशजी भांगडिया, श्रीकांतजी भांगडिया, भाजपा नेते तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजपाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिलीप शिवरकर, ज्येष्ठ नेते जितेंद्र मोटघरे तसेच महायुतीचे सन्माननीय नेते व हजारोच्या संख्येने जनसमुदाय या नामांकन महारॅलीत सहभागी झाला.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!