spot_img
spot_img
30.2 C
New York
Saturday, June 6, 2026

वीज पडून शेतमजूर गंभीर जखमी

शेतात काम करीत असताना अचानक झालेल्या विजगर्जनेने शेतमजूरांची तारांबळ

सध्या सोयाबीन कापनीचा हंगाम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात शेतमजूर सोयाबीन कापणीला लागले आहे. त्यातच आज दि. १८ ऑक्टोबर ला शेगाव बु इथून जवळ असलेल्या शेगाव खुर्द च्या परिसरातील शेतातमध्ये दुपारच्या सुमारास शेतामधे सोयाबीन कापणी सुरु असताना अचानकपने वीज गर्जना व पाऊस सुरु झाला. अचानक सुरु झालेल्या वीज गरजनेमुळे शेतातील शेतकरी व शेतमजूर यांची एकच तारांबळ उडाली. त्यातच विजु जांभुळे याचे शेतात वीज पडून शेतकरी विजु उद्धव जांभुळे वय ४५ वर्षे व त्यांच्यास शेतात काम करणारी शेत मजूर मंजुषा प्रदीप क्षीरसागर वय ४० वर्षे हे दोघेही गंभीर रित्या जखमी झाले. दोन्ही जखमीना शेगाव बु येथील नुकत्याच सुरु झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पण तिथे योग्य त्या सुविधा नसल्या कारणांनी दोन्ही जखमीना वरोरा येथील उप जिल्हा रुग्णालय येथे रवाना करण्यात आले. तिथे या दोन्ही जखमी व्यक्तीवर उपचार सुरु आहे.

सध्या सोयाबीन कापणीच्या हंगामाला जोर चढला आहे त्यातच परतीच्या पाऊसाने हजेरी लावल्याने बळीराज्याचे डोक्याचे टेंशन मात्र वाढलेले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!