spot_img
spot_img
25.1 C
New York
Saturday, June 6, 2026

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ भंडाराचा अनोखा उपक्रम…!

दोन दिवसीय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न…

भंडारा

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ भंडारा द्वारा आयोजित,” गांधीजीच्या जीवनावर आधारित ” जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, दि. १३, १४ सप्टेंबरला ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ५१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल दिनांक १५ सप्टेंबरला घोषित करण्यात आला. त्यात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक ओम श्रावण फुंडे, गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढा, याने पटकाविला. द्वितीय क्रमांक कु. भाविका प्रमोद वैद्य तृतीय क्रमांक कु. तृप्ती विलास हातेल हिने मिळविला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक कु. साक्षी रमेश वंजारी द्वितीय क्रमांक कु. गायत्री देवानंद पातोडे तर तृतीय क्रमांक कु. ख़ुशी रवींद्र भोयर हिने प्राप्त केला.

जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, मराठी महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा. सुनील डीसले( बारामती), महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार(चंद्रपूर), यांनी स्थान भूषविले. तर स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटन, मराठी महासंघाचे राज्य सचिव प्रा. बाळासाहेब माने(मुंबई) तसेच विजुक्ता केंद्रीय उपाध्यक्ष- प्रा. रमेश खाडे, (अमरावती), प्रा. डी. एस. राठोड, (अकोला) यांनी पार पाडले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक कार्याध्यक्ष प्रा. संपत गर्जे(पुणे), डॉ.मनीषा रिठे, डॉ. अंजना खताळ(मुंबई), प्रा. संजय पाटील ( रायगड) डॉ. विजय हेलवटे (चंद्रपूर), प्रा. पोमेंद्रकुमार कटरे, गोंदिया , प्रा. यशवंत पवार, यवतमाळ, प्रा.ओमप्रकाश ढोरे अमरावती, प्रा. दीपा ठाणेकर मुंबई, प्रा. योगेंद्र सनेर धुळे, प्रा.निलेश आमले जुन्नर, प्रा.विजया मने, गडचिरोली, प्रा. नामदेव मोरे, चंद्रपूर, प्रा. सुरेश नखाते , नागपूर यांनी भूषविले.

या दोन दिवशीय स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.वसुधा देवगडे, प्रा. लोमेश दरवडे, प्रा.कुंडलिक राठोड, डॉ. ज्योती दुफारे, डॉ. शालिनी तेलरांधे, प्रा. ऋषी दिघोरे, डॉ. जुगल धोटे, प्रा. अंजली रघाटाटे, प्रा.अंकुश मंडलवार, प्रा. जगदीश खेडकर, प्रा.ज्योती शेंडे, प्रा.पोर्णिमा मेश्राम..यांनी काम पाहिले.


मराठी विषय शिक्षक महासंघ भंडारा जिल्हा नेहमीच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवित असते. या दोन दिवसीय वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमांचे संपूर्ण आयोजन, नियोजन व संचालन प्रा. संजय लेनगुरे राज्यकोषाध्यक्ष, यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रांजली दरवळकर यांनी, तर मान्यवरांचे आभार प्रा. प्रियंका बोपचे, यांनी मानले. स्पर्धा कार्यक्रम नियंत्रण अधिकारी म्हणून प्रा. विनोद हटवार यांनी काम पाहिले. कु. साक्षी वंजारी हिने, उत्कृष्ट असे स्वागत गीत गायले. शेवटी स्पर्धा कार्यक्रमाबद्दल कु. वंशिका काळे, कु.वंशिका सोनवणे, कु. प्रांजली कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील मराठी विषय शिक्षकांनी सहभाग नोंदविला.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!