भद्रावती, दि.२९ : येथील मच्छिंद्र मच्छुआँ सहकारी संस्था मर्यादित या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.३० सप्टेंबरला दुपारी १२ वाजता स्थानिक श्री बालाजी सभागृह भोजवार्ड येथे आयोजित करण्यात आली आहे. यांसभेत विविध विषयावर चर्चा करण्यात येणार असून सत्कार सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

यात राष्ट्रपती पुरस्कृत मूळच्या भद्रावती येथील सुकन्या सहाय्यक अधिसेविका आशा वामनराव बावणे (सोनुने) गडचिरोली यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भोई समाज रत्न म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. या सर्वसाधारण सभेला तसेच सत्कार सोहळ्याला संस्थेच्या सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष दिलीप मांढरे यांनी केले आहे.






