वरोरा : आज सकाळ पासुन वरोरा चिमूर महामार्गावर शेडगाव गावाजवळील पुलाच्या अपुर्ण कामामुळे ट्रक फसला आणि घोषित झालेला चिमुर वरोरा महामार्ग पुन्हा बंद झाला.
मागील कित्येक वर्षापासून वरोरा चिमूर महामार्गाचे काम अतिशय कासव गतीने चालु आहे. या रस्त्या च्या कामाविषयी अनेक गावकरी तसेच संघटनांनी आवाज उठविला. परंतु शासन प्रशासन जाणुन दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे. शासनाने एखाद्या समस्याकडे एवढ दुर्लक्ष कस का करू शकते? यात शासनाच्या अधिकाऱ्यांची काही मिलीभगत तर नाही ना? असे नागरिकांना प्रश्न पडत आहे.






