राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी पदभार सांभाळताच सचिव पदावरील मात्तबर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची वित्त विभागात उचलबांगडी करण्यात आली असून नागरी उड्डायन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात पशुसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी पदभार सांभाळताच सचिव पदावरील मातब्बर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची वित्त विभागात उचलबांगडी करण्यात आली असून नागरी उड्डायन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पशुसंवर्धन खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महापारेषण विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डी. टी. वाघमारे यांच्याकडे गृह खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. आयएएस अधिकारी श्रीमती राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्यांक विभागात बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची महापारेषणच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. श्रावण हर्डीकर यांची मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.






