शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचे तायक्वांडो खेळाडू विभाग स्तरावर..
भद्रावती
क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच जिल्हास्तरीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा नीलकंठराव शिंदे महाविद्यालय भद्रावतीच्या इनडोअर स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आले. या जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, प्रा.रमेश चव्हाण , प्रा किशोर ढोक, सतीश खेमस्कर हे प्रामुख्याने उपस्थितीत होते.
या झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांडो क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचा १९ वर्ष गटातील खेळाडू आशिष रवींद्र देऊरकर हा स्पर्धेमध्ये विजयी होऊन जिल्हात प्रथम स्थान पटकाविले. हा खेळाडू आता नागपूर विभागातील होणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचा १७ वर्षे वयोगटातील खेळाडू यश टेकाम हा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयी झाला. तो सुद्धा या क्रीडा प्रकारात चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधी विभाग स्तरावर करणार आहे. विजयी झालेल्या खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण, डॉ ज्ञानेश हटवार , माधव केंद्रे, किशोर ढोक तसेच शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.






