भद्रावती
भद्रावती येथील निळकंठराव शिंदे महाविद्यालय भद्रावती येथील प्राध्यापक डॉ विशाल शिंदे यांची शाॅर्ट टर्म कोर्स साठी निवड करण्यात आली. युजीसी मालविया मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर द्वारा भारतातील शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्र मधील नामवंत संस्था लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्यूकेशन, ग्वालियर. मध्यप्रदेश. येथे २०/०८/२०२४ ते २७/०८/२०२४ अंतर्गत होणाऱ्या (योगा फॉर फिसिकल अँड मेंटल हेल्थ) या शॉर्ट टर्म कोर्स करिता डॉ. विशाल निळकंठराव शिंदे यांची निवड झालेली आहे.या ट्रेनिंग मध्ये भारतातील अनेक राज्यातील विविध विद्यापीठातील प्राध्यापकांचा समावेश आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती येथील प्राध्यापक डॉ. विशाल निळकंठराव शिंदे संचालक शारिरीक शिक्षण व क्रीडा विभाग यांची एकमेव निवड झालेली आहे.
आता पर्यन्त कबड्डी, तायकांदो, व शारिरीक शिक्षण व क्रीडा या विषयावर ३ पुस्तके यांची प्रकाशित असून विविध युजिसी केअर लिस्टेड संशोधनं पत्रिकेत आंतरराष्ट्रीय स्तरावर १३ रिसर्च पेपर प्रकाशित आहेत. शारिरीक शिक्षण व क्रीडा या विषयासंदर्भात विवीध ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीषदमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे. १०० व्या दीक्षांत समारंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या वतीने भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती व भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते आचार्य पदवी सन्मान व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आलेले होते. यांच्या निवडीबद्दल क्रीडा प्रेमी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.






