कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ भंडारा चा अनोखा उपक्रम
भंडारा
. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ भंडारा द्वारा आयोजित, जिल्हास्तरीय ऑनलाईन देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा दिनांक 25 ऑगस्ट ला पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 55 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध असे रंगारंग देशभक्तीपर गीते सादर केली. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात जिल्हा परिषद महात्मा गांधी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील कु. सानिया ओमप्रकाश काडगाये हिने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक कु. प्रणाली दिलीप धाडसे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आसगाव ता. पवनी हिने, तर तृतीय क्रमांकाची मानकरी कु. भूमिका मांडवकर नगरपालिका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पवनी ही ठरली. उत्तेजनार्थ क्रमांक कु. शितल नारनवरे एस. एन. मोर महाविद्यालय तुमसर, कु. माधवी वाघमारे, विकास विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय खरबी नाका, कु. प्रतीक्षा ठवकर, विनोद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली यांनी मिळविला.
सदर ऑनलाइन स्पर्धा कार्यक्रमात मराठी महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनील डिसले, राज्य सचिव प्रा. बाळासाहेब माने, उपाध्यक्ष डॉ. प्रतिभा बिश्वास यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. शालिनी तेलरांधे, प्रा. विजया मने, प्रा. मृगा पागे यांनी केले आणि पारदर्शक निकाल दिला.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुधीर मोते, डॉ. अंजना खताळ, डॉ. ज्ञानेश हटवार, डॉ. विजय हेलवटे, प्रा. पवन कटरे, प्रा. नामदेव मोरे, प्रा. गिरीश काळे, प्रा. यशवंत पवार प्रा. सुरेश नखाते, प्रा. प्रा. दिलीप जाधव, प्रा.संजय पाटील ( रायगड ) उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, प्रास्ताविक व संचालन प्रा. संजय लेनगुरे यांनी केले. तर मान्यवरांचे आभार प्रा. विनोद हटवार यांनी मानले. ऑनलाईन स्पर्धा कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुतांश मराठी विषय शिक्षक ऑनलाईन उपस्थित होते…!






