spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महावाचन उत्सव साजरा …

भद्रावती

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत यशवंतराव शिंदे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे महावाचन उत्सव साजरा करण्यात आला. वाचन हे ज्ञान आणि नवनिर्मितीचे मूळ बीज आहे . वाचन हे आनंदासाठी आणि मानवाच्या विकासासाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्याची सवय वृद्धिंगत व्हावी, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, या हेतूने महावाचन उत्सव साजरा करण्यात आला.

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी पुरेपुर वापर करावा. त्याचं वाचन कराव म्हणून विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ सुधीर मोते, डॉ ज्ञानेश हटवार, प्रा किशोर ढोक , प्रा. उज्ज्वला वानखेडे, आत्माराम देशमुख यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले.

शाळेतील व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महावाचन उत्सवात सहभाग घेतला. यांची सुरुवात थोर वैज्ञानिक, भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिना पासून करण्यात आली . तसेच प्रत्येक आठवड्यात शनिवारी महावाचन कार्यक्रम नियमितपणे घेतला जातो . यावेळी वर्गाचे वर्गशिक्षक विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवतात व विद्यार्थ्यांनी कोणती पुस्तके वाचावी त्यासाठी वर्ग शिक्षक मदत करतात.

अशा प्रकारे यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात महावाचन कार्यक्रम नियमितपणे राबवला जात आहे. यासाठी शाळेतील ग्रंथपाल मुक्तावरम मॅडम व शिक्षकांचे सहकार्य लाभते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!