spot_img
spot_img
25.1 C
New York
Saturday, June 6, 2026

इनरव्हील क्लब भद्रावतीचा मानसिक स्वास्थ्य जागरूकता कार्यक्रम संपन्न..

भद्रावती

इनरव्हील क्लब भद्रावती द्वारे विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य जागरूकता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. फेरिल्यांड स्कूल भद्रावती येथे घेण्यात आलेल्या मानसिक आरोग्य जागरूकता या कार्यक्रमात डॉ. कुणाल दमकोंडावार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मानसिक आरोग्य कसे सांभाळावे या विषयावर मार्गदर्शन केले.

इनरव्हील क्लब भद्रावती द्वारे आयोजित मानसिक आरोग्य जागरूकता हा कार्यक्रम फेरिल्यांड स्कूल भद्रावती येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून डॉ कुणाल दमकोंडावार नागपूर तर प्रमुख अतिथी प्रेमा पोटदुखे , अध्यक्ष इनरव्हील क्लब भद्रावती, सुनीता खंडाळकर सचिव इनरव्हील क्लब भद्रावती तसेच प्राचार्य वर्षा धानोरकर फेरिल्यांड स्कूल भद्रावती ह्या व्यासपीठावर उपस्थित होत्या.

डॉ कुणाल दमकोंडावार यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देत असताना भावना, विचार, वर्तन यांचे महत्त्व पटवून दिले. आपल्याला लागलेल्या वाईट सवयी दूर करण्यासाठी, मानसिक स्वास्थ्य नीट ठेवण्यासाठी काही बंधने स्वतःवर घातली पाहिजे. सध्या परिस्थितीत चाललेल्या समाजविघातक कृत्याबद्दल मुलींनी स्वतः सतर्क राहिले पाहिजे असेही सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमा पोटदुखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशनी हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रश्मी बिसेन यांनी केले. कार्यक्रमाला तृप्ती हिरादेवे, विश्रांती उराडे, मनीषा ढोमणे, वर्षा महुर्ले, वैशाली सातपुते, संगिता जक्कुलवार, अर्चना मॅडम, कुमुद पोईनकर, सोनाली बेदरे तसेच फेरील्यांड स्कूल भद्रावती येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!