spot_img
spot_img
22.2 C
New York
Friday, July 31, 2026

मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्षपदी प्रा सुनील डिसले तर सचिव पदी बाळासाहेब माने यांची फेरनिवड..

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक संघाची नवीन कार्यकारी घोषित

मुंबई

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य या शासनमान्य नोंदणीकृत संघटनेची नवीन कार्यकारी ची निवड दि.२४
ऑगस्ट २०२४ ला महाराष्ट्रातील मराठी विषय शिक्षक महासंघाची ऑनलाईन सभा घेऊन जाहीर करण्यात आली. सन २०१० पासून ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहे. पण २०१९ ला मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली.
कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर मराठी विषय अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची ही सर्वात मोठी संघटना आहे.

यात कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर मराठी भाषा विषयातील शिक्षकांच्या समस्या, अध्ययन अध्यापन करताना येणाऱ्या अडचणी या संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जाऊन मराठी भाषा विषय हा महाराष्ट्रात इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्याशाखेत शक्तीचा व्हावा. त्याला कुठल्याही विषयाचा पर्याय असता कामा नये ही महासंघाची भूमिका आहे. यासाठी शासन स्तरावर, प्रशासकीय स्तरावर संघटनेच्या माध्यमातून अनेक पत्र व्यवहार झाले.

संघटनेच्या घटनेप्रमाणे दर तीन वर्षांनी राज्य कार्यकारणीची निवड करून कार्यकारिणी घोषित करण्यात येते. सन २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची नवीन राज्य कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्ष प्रा. सुनील डिसले बारामती, सचिव प्रा. बाळासाहेब माने मुंबई,
उपाध्यक्ष प्रा. डॉ प्रतिभा विश्वास मुंबई, प्रा. डॉ ज्ञानेश हटवार चंद्रपूर, खजिनदार प्रा. दिलीप जाधव सांगली, प्रा. संजय लेनगूरे भंडारा, समन्वय प्रा. डॉ पांडुरंग कंद पुणे, प्रा. डॉ राजेंद्र सोनवणे जालना, सहसचिव प्रा. डॉ स्मिता भुसे अहमदनगर,प्रा. बापू खाडे पुणे, सल्लागार प्रा. संपतराव गर्जे पुणे, डॉ विजय हेलवटे चंद्रपूर, डॉ अंजना खताळ मुंबई, प्रा नीता खोत नागपूर, जिल्हा प्रतिनिधी प्रा. दीपा ठाणेकर मुंबई, प्रा. मंजिरी गरजे ठाणे, प्रा. रेखा कटके रायगड, प्रा. महादेव इरकर पालघर, प्रा. अरविंद मोडक पुणे, प्रा. डॉ शरद दुधाट नगर, प्रा. ज्योतिबा काटे सोलापूर, प्रा. बाळासाहेब माळवे कोल्हापूर, प्रा. प्रा. दादासाहेब साळुंखे सातारा, प्रा. बाबासाहेब पाटील सांगली, प्रा. भाग्यदेवी चौगले रत्नागिरी, प्रा. विजयकुमार सावंत सिंधुदुर्ग, प्रा. चांगदेव खोले नाशिक, प्रा. सुधाकर ठाकुर जळगाव, प्रा. योगेंद्र सनेर धुळे, प्रा. मीनल पाटील नंदुरबार, प्रा. संतोष परसे संभाजीनगर, प्रा. प्रवीण भुतेकर जालना, प्रा. डॉ आत्माराम झिंगुर्डे बीड, प्रा. संतोष कदम परभणी, प्रा. सुशीलकुमार कावरखे हिंगोली, प्रा. व्यंकट दुडिले लातूर, प्रा. कमलाकर कमठे नांदेड, प्रा. संतोषकुमार कोठावळे धाराशिव, प्रा. ओमप्रकाश ढोरे अमरावती, प्रा. निलेश पाकदुने अकोला, प्रा. गणेश शिंदे बुलढाणा, प्रा. यशवंत पवार यवतमाळ, प्रा. प्रशांत कवर वाशिम, प्रा. सुरेश नखाते नागपूर, प्रा. गिरीश काळे वर्धा, प्रा. विनोद हटवार भंडारा, प्रा. पवन कटरे गोंदिया, प्रा. नामदेव मोरे चंद्रपूर, प्रा. विजया मने गडचिरोली. अशाप्रकारे कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाची नवीन राज्य कार्यकारिणी निश्चित झालेली आहे.

जिल्हा निहाय इच्छुक व अनुभवी असा एक प्रतिनिधी नियुक्त केला आहे. राज्य कार्यकारणीत पदाधिकारी व जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी स्वेच्छेने अनेकांनी आपल्या प्रस्ताव राज्य कार्यकारिणीकडे पाठवला होता. त्याची पडताळणी करून अनुभवी व इच्छुक प्रतिनिधींची योग्य निवड करण्यात आली. शिवाय महिलांनाही प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे या दृष्टीने महिला प्रतिनिधींची निवड या ठिकाणी करण्यात आली. ही राज्यकारिकांनी सर्व समावेशक असून “महाराष्ट्रात इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्याशाखेत मराठी विषय हा शक्तीचा व्हावा, व मराठी विषयातील शिक्षकांचा कार्यभार कायम राहील तसेच मराठी विषय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जातील यासाठी ही राज्य कार्यकारणी कटिबद्ध आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असतांनाच मराठी भाषेला महाराष्ट्रात जी सापत्न वागणूक दिली जाते, हे मराठी विषय शिक्षक महासंघ कदापीही खपवून घेणार नाही ” असे मत संघटनेचे अध्यक्ष प्रा सुनील डिसले सर यांनी व्यक्त केले. नवनियुक्त राज्य कार्यकारिणीचे महाराष्ट्रात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!