व्यापारी मंडळाचे ग्रामपंचायतला निवेदन
वरोरा, दि. 22 : वरोरा तालुक्यातील शेगाव बू. येथील आठवडी बाजार हा दर सोमवार ला भरत असतो. पण दि. २ सप्टेंबर रोज सोमवार ला येणारा आठवडी बाजार हा ऐन पोळ्याच्या दिवशी येत असल्या कारणाने त्या दिवशी बाजारात ग्राहक येणार नाही अशी आशंका आहे. तसेच शेगाव बाजाराला येणारी बहुतांश जनता ही ग्रामीण भागातील असून पोळा हा शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा व मोठा सण असल्यामुळे जनतेची व व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणत गैरसोय होऊ शकते. त्यामुळे २ सप्टेंबर सोमवरला होणारा आठवडी बाजार हा १ सप्टेंबर रविवारला भरवण्यात यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे शेगाव ग्रामपंचायतला शेगावच्या व्यापारी मंडळांनी दिले आहे.






