भद्रावती
भद्रावती येथील आर्य वैश्य महिला महासभा तालुका भद्रावती च्या वतीने नुकतेच जिल्हा परिषद कन्या शाळा भद्रावती येथील लहान मुलांना खाऊचे तथा शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्य वैश्य महिला महासभा भद्रावती तालुका अध्यक्ष धनश्री गुंडावार होत्या . तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तुमराम मॅडम , शारदा गुरूले मॅडम , सचिव भाग्यश्री दैदावार , ज्योती गुंडावार , मानसी बोटुवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या वेळी आर्य वैश्य महिला महासभा भद्रावती तालुका अध्यक्ष धनश्री गुंडावार यांनी आर्य वैश्य महिला महासभेच्या कार्याची माहिती दिली . त्या नंतर उपस्थित विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते जिवनावश्यक वस्तुंचे तथा शालेय वस्तुचे वाटप करण्यात आले . तसेच भाजी विक्रेते ,फळ विक्रेते , यांना छत्रीचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाची सुरुवात देशभक्ती पर गीत सहसचिव सौ. अस्मिता झुलकंठीवार यांनी गायले आणि समारोप राष्ट्रगीताने झाला. या वेळी आर्य वैश्य महिला महासभा भद्रावती , अध्यक्ष सौ. धनश्री गुंडावार ,सचिव सौ.भाग्यश्री दैदावार, कोषाध्यक्ष सौ.ज्योती गुंडावार ,सह कोषाध्यक्ष सौ. मानसी बोटूवार, सहसचिव सौ.अस्मिता झुलकंठीवार सर्व मेंबर्स श्रीमती रेखा गुंडावार सौ. वंदना गुंडावार, सौ.अर्चना सिद्धमशेट्टीवार सौ . सारिका गुंडावार सौ. करूणा पत्तीवार, सौ. सारिका पदमावार, सौ.गायत्री मद्दिवार आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






