विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती साठी शिक्षक पालक संघ महत्त्व पूर्ण.. प्राचार्य डॉ जयंत वानखेडे
भद्रावती :
स्थानिक यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी येथे २०२४ – २०२५ या सत्रामध्ये पालक – शिक्षक संघ गठीत करुन नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष डा. जयंत वानखेडे प्राचार्य, उपाध्यक्ष श्री प्रमोद तेलंग, सचीव श्री विजय लांबट, सहसचिव सौ. पुष्पाताई सेलोकर, पालक प्रतिनिधी श्री पंढरी कामतवार, सौ. अर्चनाताई इंगोले, विद्यार्थी प्रतिनिधी प्रकाश उमरे, कल्याणी सेलोकर, सदस्य सर्व वर्गशिक्षक इ. निवड करण्यात आली. यावेळी पालकांची भूमिका यावर प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी मार्गदर्शन केले
यावेळी उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. सभेचे संचालन श्री आत्माराम देशमुख सरांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सुहास कोल्हे सरांनी मानले. सभेला पालक, प्राध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






