भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचलित यशवंतराव शिंदे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे वर्ग आठवीच्या प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.
यशवंतराव शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे वर्ग आठवीत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने गणवेश व पुस्तके वितरित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, डॉ सुधीर मोते , किशोर ढोक, ए एम देशमुख उपस्थित होते.
वर्ग आठवी प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप व शालेय गणवेश वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी “शालेय शिस्त अबाधित राखून शाळेत नियमित गणवेशातच उपस्थित राहावे व अभ्यासात सातत्य ठेवून प्रगती करावी” असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए एम देशमुख यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश नंदनवार यांनी केले , तर आभार प्रदर्शन सुहास कोल्हे यांनी केले. यावेळी डॉ ज्ञानेश हटवार, रमेश चव्हाण, सी एम जुमळे, समस्त शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






