भद्रावती
लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधुन महाविद्यालयात संयुक्तरित्या कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी माहिती देताना महाविद्यालयाचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांनी महापुरुषांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्याना इतिहासात महापुरुषांची भूमिका व्यक्त केली. डॉ. प्रशांत पाठक यांनी महापुरुषांचे कार्य व बलिदान राष्ट्रविकासासाठी मोलाचे असून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली. सूत्रसंचालन प्रा. प्रीती कांदिकट्टीवार यांनी केले असून आभार प्रा. प्रज्ञा लांडे यांनी केले. यावेळी असंख्य विद्यार्थ्यासह प्रा. नेहा मानकर, प्रा. कपिल राऊत, प्रा. विशाल प्रसाद, प्रा. राहुल तुराळे तसेच महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.






