spot_img
spot_img
28.2 C
New York
Wednesday, August 5, 2026

दहावीच्या विद्यार्थ्यांची फाशी घेऊन आत्महत्या…

आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात..

भद्रावती

भद्रावती शहरातील गुरु नगर येथे राहणाऱ्या पंधरा वर्षीय दहावीत शिक्षण घेत असलेल्या मुलाने सिलिंग फॅन ला दुपट्टा बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली. ह्या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे . यथार्थ शुभाष भोयर वय पंधरा वर्ष राहणार गुरुनगर असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

यथार्थ भोयर हा शहरातील सेन्ट ऑनस हायस्कूल सुमठाणा, भद्रावती येथे दहाव्या वर्गात शिक्षण घेतो होता. त्याची आई ही ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे पॅथॉलॉजिस्ट या पदावर पदावर कार्यरत आहे. तर वडील मेघे सावंगी येथे रुग्णालयात कार्यरत आहेत.

यथार्थ हा भद्रावती येथे आपल्या आई सोबत राहत होता. आज शाळेमध्ये कार्यक्रम असल्याने शाळा सकाळ पाळीत घेण्यात आली. दुपारी बारा वाजता शाळेला सुट्टी झाली .

शाळेतून घरी आल्यानंतर त्याने घरातील सिलिंग फॅन वरती दुपट्टा बांधून गळफास घेतला. त्याची आई मध्यान्तर सुट्टीनंतर घरी आली असता तिला हा प्रकार दिसला. तीने त्वरित उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे नेले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले .

दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलाने आत्महत्या करण्याचे कारण काय ? याचा तपास भद्रावती चे ठाणेदार बीपिन इंगळे घेत आहेत. या आत्महत्येमागे शाळेतील काही प्रकरण तर नाही ना? त्याला सर्व विद्यार्थ्यांसमोर कुठली शिक्षा तर दिली नव्हती ना ! किंवा कठोर शब्दात त्याला रागावले तर नव्हते ना ! अशी शंका कुशंका व्यक्त केली जात आहे. शाळेत मुलांना शारीरिक दिशा देणे अथवा सर्वांसमोर अपमान जनक बोलणे यावर शासनाने बंदी घातली आहे. मात्र याच्या आत्महत्येला कारणीभूत कोण ? शाळा प्रशासन की घरातील काही प्रकार आहे या दिशेने पोलीस यंत्रणा तपास करीत आहे. मात्र या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!