शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शहिदांना श्रद्धांजली
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालक यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे रौप्य महोत्सवी कारगिल विजय दिन संपन्न झाला व या युध्दात हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली.
26 जुलै रोजी कारगिल विजय दिन संपूर्ण देशात साजरा होत आहे. भद्रावती येथील यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात
रोप्यमहोत्सवी कारगिल विजय दिन साजरा झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सौ. उज्ज्वला वानखेडे, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्रा. कमलाकर हवाईकर , प्रा. डॉ प्रशांत पाठक, प्रा किशोर ढोक व्यासपीठावर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी “शहीद वीरांचे हौतात्म्य आपल्याला प्रेरणा देत राहील, व देश प्रेमाची भावना सतत जागृत ठेवील असे मनोगत व्यक्त केले.” तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर मोते यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रृती नागपूरे हिने केले तर आभारप्रदर्शन कु. नताशा नागरे हिने केले.
कार्यक्रमाला प्राध्यापक डॉ ज्ञानेश हटवार , माधव केंद्र, प्रेमा पोटदुखे, संगीता जक्कुलवार तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






