spot_img
spot_img
22.3 C
New York
Thursday, July 30, 2026

ग्राहकांची विश्वासहर्ता वाढवून बँकेचे वटवृक्षात रूपांतर करा : डॉ.विवेक शिंदे

बँक ऑफ बडोदाचा ११७ वा वर्धापन दिन

भद्रावती, दि. 20 : आपल्या बँकेची ग्राहकांप्रति आणखी विश्वासहर्ता वाढवून जास्तीत जास्त ग्राहकांना आपलेसे करा. ही शाखा वटवृक्षा सारखी डेरेदार करण्यासाठी प्रयत्न करा. असे विचार समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. विवेक शिंदे यांनी मांडले. ते बँक ऑफ बडोदाच्या ११७व्या वर्धापन दिनानिमित्त शाखेत आयोजित समारंभात बोलत होते.

सन १९०८ मध्ये राजे सर सयाजीराव गायकवाड (तृतीय) यांनी गुजरात येथील बडोदा शहरात स्थापन केलेल्या बँकेच्या आज १०० देशात शाखा आहेत. ही देशातील अग्रगण्य बँक आहे.२०१२ मध्ये या ठिकाणी बँकेची शाखा उघडण्यात आली. अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात भद्रावतीकरांनी आम्हाला सहकार्य केले आहे. यापुढेही भद्रावती करांकडून यापेक्षा जास्त सहकार्य मिळेल अशी अपेक्षा बँक व्यवस्थापक अतुल ठावरी यांनी व्यक्त केली. दिलीप ठेंगे, अविनाश सिद्धमशेट्टीवार यांनी सुद्धा आपले विचार मांडले. तत्पूर्वी सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलित केला.

दि.१९ जुलैला येथील भवानी मंदिरा लगतच्या नगर परिषदेच्या रुग्णालयाचे परिसरात वृक्षारोपण पार पडले. या दोन्ही कार्यक्रमास यावेळी शाखेच्या सहाय्यक व्यवस्थापक मनीषा शेंडे, वरिष्ठ लिपिक अतुल जाधव, रोखपाल सुशांत गावंडे, मिलिंद चेंदे, साहिल नागपुरे, धनराज लांडगे, रामा मते तसेच असंख्य ग्राहक उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!