spot_img
spot_img
25 C
New York
Thursday, July 30, 2026

भद्रावती येथे राज्यस्तरीय कॅडेट स्पर्धेचे आयोजन १९ ते २१ जुलै ला…

राज्यभरातील खेळाडूंचा भरणार मेळावा भद्रावतीत

क्रीडा प्रेमींना आनंदाची पर्वणीच..

भद्रावती येथे राज्यस्तरीय कॅडेट क्युरेगी आणि फुमसे स्पर्धा दि. १९ ते २१ जुलै २०२४ भद्रावती येथील मारोतराव पिंपराळे सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रीक ही संस्था करत आहे. या तीन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेकरीता महाराष्ट्रातील संपुर्ण ३६ जिल्हामधील १४ वर्षाखालील मुले व मुली या स्पर्धे सहभागी होणार आहेत. साधारण पणे या राज्यस्तरीय स्पर्धेत ६०० ते ७०० खेळाडु सहभागी होणार आहेत असे चंद्रपुर तायक्वांदो असोसिएशन चे अध्यक्ष डॉ विशाल शिंदे व सचीव श्री. सतीश दि. खेमस्कर सर यांनी सांगीतले आहे.


तायक्वांदो हा खेळ ऑलेंपीक स्पर्धमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. तसेच साऊथ कोरीयाचा तायक्वांदो हा राष्ट्रीय खेळ आहे.भद्रावती येथे होणाऱ्या स्पर्धेकरीता संपुर्ण सेंसर चा वापर करण्यात येणार आहे . २०१२ नंतर दुसऱ्यांदा अशी स्पर्धा आपल्या चंद्रपुर जिल्ह्यात व भद्रावती येथे पहिल्यांदा घेण्यात येत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डाॅ. कार्तिक शिंदे सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डाॅ. सागर वझे सर सिनेटर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, अनिकेत सोनावणे तहसीलदार , विपिन इंगळे ठाणेदार भद्रावती, डॉ विशाल शिंदे अध्यक्ष तायक्वांदो अशोशिएशन चंद्रपूर व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे संपुर्ण पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

राज्यस्तरीयताय कांदो स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दि. १९ जुलै २०२४ रोज शुक्रवारला पिंपराळे सभागृह भद्रावती येथे पार पडणार आहे . स्पर्धेकरीता येणाऱ्या संपुर्ण खेळाडु आणि प्रशिक्षकांचे चंद्रपुर जिल्ह्यामध्ये भद्रावती शहरात स्वागत आहे. या स्पर्धेत होणाऱ्या कार्यक्रमाला चंद्रपूर शहरात क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन तायक्वांदो अशोशिएशन चंद्रपूर व्दारे करण्यात आले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!