भद्रावती :
यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात शाळेचे मुख्याध्यापक डाॅ. जयंत वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली शालेय मंत्रीमंडळाची स्थापना व वर्ग नायक, उपनायकांची निवड गुप्त मतदान पद्धतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांना विद्यार्थीदसेपासूनच लोकशाही प्रक्रिया, लोकशाही प्रक्रियेतील निवडणूका ,त्यांचे प्रत्यक्ष अनुभव यावे यासाठी शालेय मंत्रीमंडळ स्थापन करण्यात आले .
मुख्यमंत्री कु. कल्याणी सेलोकर, उपमुख्यमंत्री दिपक भोई, शिक्षणमंत्री प्रकाश उमरे, क्रिडामंत्री संतोष पवार, सांस्कृतिक मंत्री अनुष्का राजभर, पर्यटन मंत्री नैतिक बुरडकर, पर्मंयावरण व स्वच्छता मंत्री प्रेम बारसागडे इ. मंत्र्यांची निवड करण्यात आली. सर्व मंत्र्यांना शाळेचे मुख्याध्यापक डाॅ जयंत वानखेडे सरांनी पद व गोपनीयतेची शपथ देऊन त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व शिक्षकवृंदानी सुध्दा सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यासाठी एस. नंदनवार, ए. देशमुख सरांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले व इतर सर्व शिक्षकवृंदानी त्यांना सहकार्य केले.






