दि. २ जुलै
वरोरा: स्थानिक कै निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयांमध्ये संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्वर्गीय नीलकंठराव शिंदे यांचे जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉक्टर कार्तिक शिंदे सर यांचे मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाला प्राचार्य गुरुदेव जुमडे, प्राध्यापक पिऊश लांडगे, प्राध्यापिका सीमा बोभाटे, प्राध्यापिका प्रणाली नरड, कुमारी दिव्या पेचे, इंदिरा निखाडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमात आवळा, हिरडा, अर्जुना, वड, पिंपळ अशा जातीवंत वृक्षांची तसेच फुलझाडांची सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले. सुरुवातीला ही सर्व झाडे कुंडीतच जोपासल्या जातील त्यांची काळजी घेतल्या जाईल त्यांना मोठे केल्या जाईल व विशिष्ट वाढ झाल्यानंतर त्यांना जमिनीत रजवून त्यांची जोपासना केली जाईल असे आश्वासन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव डॉ कार्तिक शिंदे यांनी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आदींनी परिश्रम घेतले.






