ठाणेदार योगेंद्र सिंग यादव यांनी दिली नवीन कायद्याची माहिती
दि. १ जुलै पासुन कायद्यात झालेल्या बदलाची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी व १ जुलै पासुन बदललेल्या ३ कायद्या बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने शेगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार योगेंद्र सिंग यादव यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी नेहरू विद्यालय शेगाव बु येथे जाऊन बदललेल्या ३ कायद्याविषक माहिती दिली व सोबतच विद्यार्थ्यां मधे असलेली पोलिस विभागाबध्दल भीती दुर करून पोलिस हे आपले मित्र असल्याची खात्री त्यांना दिली. व वेळ पडल्यास पोलिस विभागाचे सहकार्य घेण्याचे आव्हाहन सुद्धा केले.
त्यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक बालाजी ढाकुणकर, ज्येष्ठ शिक्षक चांगले, खुपिया विभाग चे भीमराव पडोळे हे आदि उपस्थित होते.






