ग्रामीण रुग्णालयाचा उपक्रम…
भद्रावती
पतंजली योग समिती भद्रावती च्या वतीने आयोजित १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन मुरलीधर पाटील गुंडावार सभागृहात साजरा करण्यात आला. त्या निमित्त आज दिनांक 21/06/2024 ला गुंडावार लॉन भद्रावती येथे ग्रामीण रुग्णालय भद्रावती चे वैद्यकीय अधिक्षक डॉ मनिष सिंग यांच्या मार्गदर्शनात मोफत बीपी शुगर व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. यात ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील एनसीडी टीम व एनसीडी अधीपरीचारिका कू .वैशाली थेरकर, एनसीडी समुपदेशक कू.श्वेता कंचर्लावार यांनी योगा साठी येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांची बीपी, शुगर तपासणी केली. तसेच प्रयोगशाळा विभाग प्रयोगशाळा तंत्रज्ञ कू. मोनाली ठाकरे व हिंदलॅब च्या कू. डिंपल चाहारे यांनी रक्ताच्या चाचण्या केल्यात. या शिबिराचा परीसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.






