भद्रावती : स्थानीय जिल्हा परिषद हायस्कूल मधील सत्र – २००४-२००५ च्या दहावीची बॅचच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेह मिलन सोहळा तब्बल १९ वर्षानंतर येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे नुकताच पार पडला.

या स्नेहमिलन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जि.प.हायस्कूलचे मुख्याध्यापक अरविंद चौधरी हे होते. तर तत्कालीन शिक्षक तथा सत्कारमूर्ती अशोक सावरकर, दिलीप मोडक, गंगाधर नार्मलवार, प्रभाकर पेंदोर, शहा मॅडम, शंकर मसाडकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवर अतिथी यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. त्यानंतर स्नेह भोजन पार पडले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सत्र २००४-२००५ च्या बॅचचे आलेले सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या बॅच मधिल २ विद्यार्थी आपल्या देशाची भारतीय सेनेमध्ये सेवा करीत असलेल्या विर जवानांचा मान्यवरांच्या हस्ते भारतीय सैनिक संदीप नागपुरे व महेश कुंभारे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालनविलोक बडवाईक यांनी तर आभार प्रदर्शन विवेक मोहूर्ले यांनी केले.






