भद्रावती, दि. 14 : शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सिने आर्क मुंबई संस्थेकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2023- 24 डॉ. ज्ञानेश हटवार भद्रावती यांना जाहीर झाला आहे. 15 जून रोजी पुणे येथे आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ ज्ञानेश हटवार हे मागील २४ वर्षापासून यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे विद्यादानाचे कार्य करत आहेत. त्यांनी विद्यादानाचे कार्य करत असतानाच गोडवाना विद्यापीठ गडचिरोली ची आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. अनेक सामाजिक संघटना ते कार्यरत आहेत. तसेच पत्रकारितेचे क्षेत्रात सुद्धा ते कार्यरत आहेत. त्यांच्या या विविध क्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ ज्ञानेश हटवार यांनी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक संघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आनंदवन वरोरा येथे यशस्वी पणे घेतले. ते या संघटनेचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून राज्य कार्यकारणीत कार्यरत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे नागपूर विभाग प्रसिद्ध प्रमुख आहेत. शैक्षणिक क्षेत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. तसेच विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावतीचे ते सचिव आहेत. पुरोगामी पत्रकार संघ भद्रावतीचे अध्यक्ष आहेत. गुरूदेव सेवा मंडळ, रोटरी क्लब, झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावतीचे सदस्य आहेत. त्यांचे नियतकालिकेत विविध लेख प्रकाशित आहेत. विविध सामाजिक, साहित्यिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सीने आर्क मुंबई या संस्थेकडून प्रतिष्ठेचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.






