भद्रावती, दि. 27 : नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक बोर्ड दहावीच्या परीक्षेच्या निकालात श्री साई कॉन्व्हेन्ट भद्रावती ने उत्तम निकालाची परंपरा कायम राखत उत्कृष्ट निकाल दिला असून शाळेचा निकाल १००% लागलेला आहे.

वेदांशु पारसे व कु. वेदांन्ती आवारी या दोघांनी दहावीच्या परीक्षेत ९०.२०% गुण प्राप्त करुन श्री साई कॉन्व्हेन्ट मधुन प्रथम आले आहेत. तर ओम चौधरी या विद्यार्थ्यांने ८७.६०% गुण प्राप्त करून व्दितीय आला. तृतीय दर्पन कुमरे ८७ %, कु.श्रेया सातघरे ८५.४०%, पियुश बुरडकर ८४.४०%, प्रेम पांडे ८३.४०%, वैभव डोबलवार ८२.२०%, कु.ईशा नक्षीने ८१.८०% गुण प्राप्त केले.हे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असुन ३७ पैकी ३७ विद्यार्थीपास झाले आहेत.
या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका कु. किरण कोथळे, मुख्याध्यापक अतुल बडकेलवार, देवान॑द जुमडे, रुपाली न॑दनवार, नम्रता पतरंगे, सविता खोब्रागडे या शिक्षक वृंदाना दिले आहे तसेच आई आणि वडील यांना दिले आहे. संस्थेचे सचिव प्राध्यापक अतुल गुंडावार यांनी सर्व गुणवंत विघार्थ्यांचे अभिनंदन केले.






