भद्रावती
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चा नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. यात भद्रावती तालुक्यातील स्काय एज्युकेशन्स च्या प्राविण्य प्राप्त विद्यार्थांचा सत्कार…स्काय एज्युकेशन्स भद्रावती चा निकाल 100/% लागला. या मधील प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
स्काय एज्युकेशन भद्रावती येथील बारावी सायन्स ची विद्यार्थिनी कु. भार्गवी मृगेंद्र बरवे ८३.८३%, अभिजित रवींद्र नागोसे ८२.००% तसेच कु. वैष्णवी वासुदेव खाडे ८१.३३ गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहे.
त्यांना मिळालेल्या यशाचे श्रेय ते आपल्या आई-वडील व स्काय एज्युकेशन मधील सर्व शिक्षक, मार्गदर्शक यांना देत आहे. उत्तम निकाल दिल्याबद्दल त्यांचे पालकांनी आनंद व्यक्त केला व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.






