प्रबुद्ध जेष्ठ नागरिक संघ भद्रावती चा उपक्रम
भद्रावती :- प्रबुद्ध जेष्ठ नागरिक संघ भद्रावती यांची सर्वसाधारण सभा नुकतीच बौद्ध विहार विहार ओ.एफ.चांदा(सूमठाना) भद्रावती येथे संपन्न झाली. प्रथम मागील सभेचा अहवाल तसेच एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ चा जमाखर्च ठराव राजेंद्र पाटील सर, सचिव प्रबुद्ध जेष्ठ नागरिक संघ यांनी मांडला व उपस्थित सर्व सदस्यांनी ठराव मंजूर केला.
पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर डोंगरे सर, अध्यक्ष प्रबुद्ध जेष्ठ नागरिक संघ भद्रावती होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र.जे.ना.संघ वरोरा चे अध्यक्ष आयुष्यमान धोपटे साहेब व सचिव जांभुळकर सर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी जेष्ठ नागरिकांना आनंदी जीवन जगण्यासाठी व चागले स्वास्थ ठेवण्यासाठी काही टिप्स आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणात जेष्ठ नागरिकांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील सर यांनी केले तर आभारप्रदर्शन मिलिंद कवाडे सर यांनी केले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी अशोक जवादे सर, रामटेके सर, डोंगरे सर यांनी परिश्रम घेतले.






