भद्रावती : येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आणि लोकमान्य ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यक्तीमत्व विकास शिबिरास बालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
मागील वर्षीपासून अशा शिबिराचे आयोजन लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात केले जाते. यंदा दि.९ मे रोजी या शिबिराला सुरुवात झाली असून हे शिबिर दि.१६ मे पर्यंत चालणार आहे. शिबिरात रोज सकाळी ६ वाजतापासून दुपारी १२ वाजेपर्यंत ध्यान, प्रार्थना, योगासन, व्यायाम, बौद्धिक, संगीत, नृत्य, श्लोक, स्मरणशक्तीवर्धक खेळ, लाठी-काठी, ज्युडो-कराटे, घोष आदी विषय शिकविले जात आहेत. वर्ग ५ ते ९ चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या शिबिरात मोठ्या संख्येत सहभागी झाले असून या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे, शिबिर प्रमुख विशाल गावंडे आणि संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत.






