spot_img
spot_img
23.5 C
New York
Thursday, August 6, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हेल्पिंग हँड्स तर्फे वकृत्व स्पर्धेचे आयोजन

भद्रावती, दि. 16 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त भद्रावती शहरामध्ये वकृत्व स्पर्धेचे आयोजन शहरातील स्थानिक हेल्पिंग हँड्स NGO यांच्या तर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोडक, पवन दासरवार, पाटील, मिलिंद शेंडे होते तर मुख्य पर्यवेक्षक जवादे आणि रामटेके होते.

कार्यक्रमाचे तथा संस्थेचे अध्यक्ष कृतांत सहारे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे कार्य व या वकृत्व स्पर्धा घेण्यामागचा उद्देश सांगताना सांगितले की, भारतीय जनतेमध्ये बाबासाहेबांबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत जसे की, बाबासाहेबांना फक्त एका समाजाचे नेतृत्व करणारे नेते समजल्या जाते यामुळे बाबासाहेबांच्या इतर अष्टपैलू कामगिरीकडे दुर्लक्ष होते. हे दुर्लक्ष टाळण्यासाठी व आजच्या तरुण पिढीला महापुरुषांच्या कार्याची व योगदानाची जाणीव करून देण्यासाठी ही वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असे सांगितले.

वयोगट 7 ते 16 यामध्ये साधारणता वीस ते पंचवीस मुलांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन आपले मत मांडले. यांपैकी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस श्रावस्ती रामटेके हिला भद्रावती शहरातील युवा उद्योजक राजरत्न पेटकर यांच्यातर्फे देण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस आस्था गणवीर हिला PK ब्रदर्स प्रफुल कांबळे यांच्या तर्फे देण्यात आले. तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस नैतिक कोंगरे याला युवा उद्योजक पनवेल शेंडे यांच्या तर्फे देण्यात आले. तीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस संस्थेतील सोनल उमाटे यांच्याकडून देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना वही पेन आणि चोकलेट संस्थेतील सुकेशनी मानकर आणि प्राची वेलेकर यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीता सहारे व प्रशांत सातपुते यांनी केले तथा आजाद कुडसंगे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती भद्रावती यांनी मोलाचे सहयोग दिले. स्पर्धेला उपस्थित सर्व पालक वर्ग, संस्थेतील इतर सदस्स सागर निरंजने, प्राप्ती देवगडे, सोनु सिंग, मनोज पेटकर, अंकित तोडे, स्नेहा सातपुते, कैश शेख, स्वप्नील मत्ते, निखिल उंबरकर, दीपक कावटे, लीना उराडे, हर्षदा कमतवार, तुषार दुर्गे, वनश्री तूर्के व इतर सदस्यांनी आपले मोलाचे योगदान दिले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!