spot_img
spot_img
24.6 C
New York
Wednesday, August 5, 2026

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

अपवादात्मक परिस्थितीत दोन तासांची सवलत

चंद्रपूर, दि. 16 : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या 19 एप्रिल या मतदानाच्या दिवशी एकही कामगार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत ज्या औद्योगिक संस्था, कंपनी बंद ठेवल्याने त्यांचे नुकसान होत असेल, तेथील कामगारांना मतदान करण्यासाठी दोन ते तीन तासांसाठी सुट्टी देणे संबंधितांना बंधनकारक असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय 5 एप्रिल 2024 अन्वये निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल, रेस्टारेन्ट, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, कारखाने किंवा इतर व्यापारी आस्थापना यांच्या व्यवस्थापक मालकांना सुट्टी देणे बंधनकारक आहे.

राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीना लागु राहील, (खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी.)अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत आस्थापना व्यवस्थापनास संबंधित महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांना घेणे आवश्यक राहील, मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनेविरुध्द कारवाई करण्यात येईल.

कामगारांना मतदान करण्यास सुट्टी न दिल्यास चंद्रपूर जिल्हयातील कामगारांनी आपली तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळमजला चंद्रपूर येथे स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात प्रत्यक्ष किंवा assttcommrehd@gmail.com या ई-मेलवर करावी, असे सहायक कामगार आयुक्त यांनी कळविले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!