spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

चाय वाल्याची मूलगी बनली सहायक प्रकल्प अधिकारी

शेगावच्या करिश्मा चा गावातील इतर विध्यार्थ्यांसमोर आदर्श

वरोरा : तालुक्यातील शेगाव (बु) गावात कुठेही स्पर्धा परीक्षा साठी कोचिंग नाही किंवा मार्गदर्शनासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध नाही. मात्र एका चाय टपरी वर चाय विकणाऱ्याच्या मुलीने एम.पी.एस.सी. ची स्पर्धा परीक्षा देऊन द्वितीय श्रेणी अधिकारी बनण्याचा मान मिळविला आहे.

शेगाव मधील अशोक निखारे यांची मुलगी कु. करिश्मा अशोक निखारे हिने २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेत यश संपादन करत गावासमोर आदर्श निर्माण केला. करिश्मा चे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेगावं येथे ४ थी पर्यंत व ५ ते १० पर्यंत चे शिक्षण संत काशिनाथ महाराज कन्या विद्यालय, शेगाव बु. येथून पूर्ण केले. त्या नंतर तिने ११ व १२ वि चे शिक्षण आनंद निकेतन कॉलेज वरोरा येथून पूर्ण केले व अंजुमन कॉलेज अँड टेक्नॉलॉजी नागपूर इथून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.

हलाकीची परिस्थिती असताना सुद्धा इथ पर्यंत शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी न मिळाल्याने तीने नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी २०१७ ला घरूनच सुरू केली.त्या नंतर २०२३ ला ती पुणे इथे क्लासेस साठी गेली.करिश्मा ची आई घरी शिवणकाम करुन वडिलांना घर चालवायला हातभार लावते. त्यामुळे तीच्या या यशा बद्दल सम्पुर्ण गावातून तीच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाचे कौतुक म्हणून विकास ग्रुप शेगाव तर्फे आज दि. २३ मार्च ला तिचा विनोद चिकटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यावेळी आई सिंधुताई निखारे, वडील अशोक निखारे, भाऊ त्रिशूल निखारे, विनोद चिकटे, साळवे, अमोल दातारकर, देवराव साखरकर, रुपेश फुटाणे, प्रकाश चोधरी, रवी वाटकर, रंजना चिकटे, स्वेता नरड, स्नेहा घोडमारे, विद्यार्थिनी व गावकरी हे उपस्थित होते. त्यावेळी तिने आपल्या या यशाचे श्रेय आई, वडील, गुरुजन व मित्र परिवार यांना दिले. या कार्यकमाचे संचालन चिऊ चिकटे हिने केले तर आभार स्वेता नरड यांनी मानले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!