spot_img
spot_img
28.3 C
New York
Tuesday, August 4, 2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुळगाव (वडेगाव) येथे प्रदर्शनी व पालक संवाद कार्यशाळा

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सिखेचे उपक्रम ठरले लाभदायक - मुख्याध्यापक राजीव कुटेमाटे

भद्रावती : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गुळगाव (वडेगाव) येथे सीखें द्वारा विद्यार्थी पालक संवाद कार्यशाळा घेण्यात आली. सीखें इंडिया या संस्थेद्वारा मागिल चार वर्षापासून भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरु आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सोनू फरताडे तसेच सौ. निर्मलाताई देवतळे, अंगणवाडी सेविका, सौ.जिजाबाई हनवते अंगणवाडी सेविका, वडेगाव, सिखे कोच अश्विनी वरपल्लिवार हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.


यावेळी पालकांचा लाभलेला प्रतिसाद कार्यक्रमाची यशस्वीता दर्शवत होती. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस पुरक वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी हा क्रमाक्रमाने घडत असतो, त्याला वारंवार सराव द्यावा लागतो, शिकण्यातील त्रुट्या लक्षात घेऊन त्याला नेमक्या पद्ध्तीने समजावून सांगणे आणि तसे  पुरक वातावरण देऊनच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत असते. सीखें इंडिया या संस्थेद्वारा भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरु आहे ते अधिक लाभदायक ठरले असे मत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजीव कुटेमाटे यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सिखे संस्था, मुंबई यांच्या  संयुक्त सहभाग यातून भद्रावती पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये टीचर इनोव्हेटर प्रोग्रॅम (टीआयपी) हा उपक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत वर्षभर राबविलेल्या उपक्रमांतून विद्यार्थी काय शिकले? याबाबत सिखे इंडिया उत्सव या विषयावरील शैक्षणिक प्रदर्शन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुळगाव (वडे) येथे घेण्यात आले. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भाषेतील गोष्टी आणि अपूर्णांकावरील नाविन्यपूर्ण मॉडेल बघण्यासाठी पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
     
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने  पालक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वर्ग ७ वी ची विद्यार्थिनी कु.सानवी ताजने हिने तर प्रास्ताविक कु.पल्लवी वाळके, सिखे कोच यांनी केले. तर आभारप्रदर्शन समीर मत्ते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापकसह सौ. योगिता चिमूरकर, समीर मत्ते, गुळगाव (वडे), गणेश टोंगे गुळगाव तुकुम, किशोर गुंडावार पाचगाव (मु), राजू बल्की, सावरी इत्यादी शिक्षक बांधवांसह या आयोजनासाठी सिखे कोच अश्विनी वरपल्लिवार, पल्लवी वाळके, शिवशंकर बांदुरकर इत्यादींनी यथोचीत सहकार्य केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!