spot_img
spot_img
28.3 C
New York
Tuesday, August 4, 2026

झाडीबोली नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदी प्राचार्य डॉ श्याम मोहरकर

🪷 गोंडवाना विद्यापीठात झाडीबोली नाट्यसंमेलनात एकांकिका स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन….

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मार्फत “मराठी भाषा गौरव दिना”चे औचित्य साधून झाडीबोली नाट्य संमेलन दिनांक ५ मार्च २०२४ ला आयोजित केले आहे. झाडीबोली नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदी चंद्रपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, नाट्यकर्मी डॉ श्याम मोहरकर यांची निवड करण्यात आली.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग द्वारा आयोजित झाडीबोली नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी एकांकिका स्पर्धा व एकपत्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. दिनांक ५ मार्च २०२४ ला होणाऱ्या या झाडीबोली नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, जेष्ठ नाट्यकर्मी, माजी प्राचार्य डॉ श्याम मोहरकर हे आहेत, तर स्वागताध्यक्ष डॉ प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे आहेत. या नाट्यसंमेलनाचे उद्घाटक पद्मश्री मान. डॉ. परशुराम खुणे, प्रमुख अतिथी अनिरुद्ध वनकर, प्रसिद्ध नाट्य कलावंत व गायक , डॉ श्रीराम कावळे, प्र- कुलगुरू , गोडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ ए. एस. चंद्रमौली, अधिष्ठता मानव विज्ञान विद्या शाखा, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

झाडीपट्टीतील सामाजिक समस्या, भाषा, बोली, आचार- विचार, संस्कृती यांची ओळख व अभ्यास विद्यार्थ्यांना करण्याच्या दृष्टीने आणि झाडीपट्टी रंगभूमीचे जतन व संवर्धन करणे या उद्देशाने “मराठी भाषा गौरव दिना” निमित्त गोडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे आयोजित या नाट्यसंमेलनात गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने दिनांक ५ मार्च २०२४ रोजी झाडीपट्टी झाडीबोली नाट्य संमेलन होत आहे.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे आयोजित झाडेबोली नाट्य संमेलनात विद्यापीठात अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होवून, आपली कला प्रदर्शित करावी व नाट्य संमेलनाचा आनंद मोठ्या संख्येने घ्यावा. असे आवाहन डॉ अनिल हिरेखण, कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ श्याम खंडारे, डॉ निलकंठ नरवाडे, डॉ सविता गोविंदवार, डॉ हेमराज निखारे प्रा. अमोल चव्हाण पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग गडचिरोली मार्फत करण्यात आले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!