spot_img
spot_img
28.3 C
New York
Tuesday, August 4, 2026

भद्रावती तालुका महीला आघाडी व्दारा माजरी शहरात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

कोणीच शिक्षणापासून वंचित राहता कामा नये : रविंद्र शिंदे

भद्रावती : स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिला महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती तालुक्यातील माजरी येथील एचएमएस युनियन ऑफिस येथे आज मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जिवन चरित्र कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसामान्यासमक्ष उपस्थितांनी भाषण तसेच लहान मुलीनी नृत्य व गायनाव्दारे प्रस्तुत करण्यात आले. पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशाने पुर्व विदर्भ सर्पक प्रमुख नेते आमदार भास्कर जाधव यांचे मार्गदर्शनात, पुर्व विदर्भ महीला सघंटीका तथा प्रवक्ता प्रा. शिल्पाताई बोडखे यांचे सुचनेनुसार विधानसभा प्रमुख रविंद्र शिदे यांचे नेतृत्वात, चंद्रपुर जिल्हा महीला सघंटीका नर्मदाताई बोरेकर यांचे पुढाकाराने भद्रावती तालुका महीला आघाडी माजरी शहरप्रमुख गायत्रीताई यमलावार व सर्व महीला पदअधिकारी यांचे प्रयत्नाने स्त्री-शिक्षण चळवळ उभी करुन महीलाना समान हक्क देणारी व साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंतीचे आयोजन माजरी येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना (उध्द बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अपर्ण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे ट्रस्ट चंद्रपूरच्या विश्वस्त तथा न. प.भद्रावती माजी नगरसेविका सुषमा शिंदे तसेच विशेष उपस्थिती म्हणून मनगाव सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष भारत पाटील वांढरे हे होते. यासोबतच चंद्रपुर जिल्हा महिला संघटिका नर्मदाताई बोरेकर, प्रमुख पाहुणे, तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, उपतालुका प्रमुख रवि भोगे, विभागप्रमुख संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती भद्रावती मनोहर आगलावे, माजरी शहर प्रमुख रवि राय, वरोरा तालुका सघंटीका सरला मालवकर, वीणा बहादे उपस्थित होते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य यावर बोलताना कोणीच शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यांची दक्षता घेणे तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे असे याप्रसंगी वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे म्हणाले. याप्रसंगी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे ट्रस्ट चंद्रपूरच्या विश्वस्त सुषमा शिंदे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून माजरी येथील दोन कॅन्सर पिडीत रुग्णांना आर्थीक मदत देण्याची घोषणा केली. ब्लॅक डायंमंड कॉन्हेालन्टचे मुलींनी सुंदर अशा नृत्य व गायनाव्दारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जिवन चरित्र प्रस्तुत केले. नृत्य व गायन प्रस्तुत करणारे लहान मुलींच्या कला गुणांना वाव व प्रोहत्सान देण्यासाठी पुरस्कार सुध्दा देण्यात आले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यकमाचे उत्कृष्ठ असे आयोजन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजरी शहर महिला संघटीका गायत्री यामलावार, शाखा प्रमुख प्रमोद ढगे, विवेक सुर्यवंशी, सुनील राजपुत, मो. अंसार खान, राकेश तोटा, ओमप्रकाश खस, किशोर ढगे व्दारे करण्यात आले. ट्रस्टचे कार्य चांगल्या पध्दतीने समाजापर्यंत पोहचावे व उपक्रमाचा लाभ जनसामान्याना मिळाव या चांगल्या हेतुन ट्रस्टचे कार्यवाहक म्हणून मधु सिंग यांची नियुक्तीसुध्दा करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी विविध उपक्रमासह स्त्री शक्तीचा आवाज आणखी बुलंद करण्याचे वचन घेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी माजरी परिसरातील महिला मुली मोठया संख्येने उपस्थित राहून सहभागी झाल्या.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!