भद्रावती तालुक्यातील यशवंत कनिष्ठ महाविद्यालय/ स्वर्गीय मातोश्री यमुनाबाई शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे गेल्या दोन दशकातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ७ जानेवारी आयोजित केलेला आहे.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंत क. महाविद्यालय तथा स्वर्गीय यमुनाबाई शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे 1992 ते 2012 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा चोरा येथील मठ परिसरात आयोजित केलेला आहे. या मेळाव्याला अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे, अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, उद्घाटक किशोर धोटे सर निवृत्त प्राध्यापक, अतिथी लक्ष्मण नन्नावरे, निवृत्त तंत्रज्ञ महा औष्णिक केंद्र चंद्रपूर, मोहन पुसणाके, प्राचार्य चोरा, डॉ. जयंत वानखेडे प्राचार्य यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती, संगीता खिरटकर सरपंच चोरा, भावना कुरेकार सरपंच वायगाव , विलास जीवतोडे उपसरपंच चोरा, डॉ सुधीर मोते यांचे मार्गदर्शन होणार आहे.
यशवंत कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथून शिक्षण घेतलेले व विविध ठिकाणी कार्यरत असलेले विद्यार्थी यांनी “आम्ही यशवंत” या माजी विद्यार्थी मेळाव्यात एकत्र येणार आहेत. तेव्हा या कनिष्ठ महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या 1992 ते २०१२ पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थी संघटने तर्फे सौ नम्रता चौधरी दमयंती बांदुरकर वैशाली जांभुळे सुवर्णमाला काकडे मंगला गराटे मंगेश जीवतोडे सचिन दिवसे योगेश वाभिइटकर सागर सागुर्ले, राकेश नन्नावरे यांनी केले आहे.






