spot_img
spot_img
24.4 C
New York
Sunday, August 2, 2026

शेगाव बु परिसरातील नागरिकांचे गडकरी यांना साकडे

चिमुर- वरोरा रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास चक्का जाम आंदोलनाचा ईशारा

वरोरा : चिमूर महामार्ग ३५३ ई चे काम एस. आर. के. नामक कंपनी ला देण्यात आले होते. पण हे काम मागील ७ वर्षां पासून अतिशय कासव गतीने सुरू आहे. काही ठिकाणी अर्धवट स्वरूपाचे पूल तर काही ठिकाणी मोठं मोठाले जीवघेणे खड्डे. कुठे खोदकाम करुन कुठलेही सावधान करणाऱ्या सूचना फकल लावलेले नाही. तर भेंडाला येथे कारण नसताना मागील १० महिन्या पासून रस्त्यावर कुठलेही सूचना फलक न लावता मशीन उभी केली आहे. तसेच या रस्त्याच्या कामामुळे मागील कित्तेक वर्षा पासून उडणाऱ्या धुळी मुळे शेतकरी यांच्या पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच शेगाव मधील नागरिक तथा परिसरातील नागरिक यांना स्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीच्या या चुकीच्या नियोजनमुळे कित्येक लोकांना आपला जिव गमवावा लागला आहे. तसेच काहींना कायम स्वरूपी अपंगत्व आले आहे. रस्त्या वरून दररोज ये जा करणाऱ्या प्रवासी, शाळकरी विद्यार्थी, तसेच नागरिकांना मानेचा तसेच कमरेचा त्रास सुरू झाला आहे.
या बाबत विविध संगठनाणी निवेदन देऊन सुद्धा काहीही उपयोग झाला नाही.


लोकप्रतिनिधी यांनी आज पर्यंत या कडे कुठलीही उपाययोजना केली नाही अथवा प्रशासनाने सुद्धा कुठलेच कठोर पाऊल उचलले नाही त्या मुळे या मुजोर एस. आर. के. कंपनी विरुद्ध व झोपलेल्ल्या लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाला जागे करण्यासाठी शेगाव येथील गावकारी तथा परिसरातील नागरिक यांनी आता कठोर भूमिका घेत येत्या ८ दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या साहाय्याने शेगाव बु येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल व त्याची जबाबदारी ही सर्वस्वी प्रशासनाची राहील असे निवेदन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, रस्ते वाहतूक मंत्री, तहसीलदार व स्थानिक पोलीस स्टेशन यांना दिले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!